नवीन का जुनी ?
अहो टॅक्स regime बद्दल विचारतेय. हल्ली नोकरदार वर्गाचा बऱ्याचदा
फोनवर ठरलेला प्रश्न म्हणजे मी कोणती regime निवडायला हवी होती ते माहीत नाही. नवी निवडली आहे पण जुनीच फायदेशीर होती की काय असे आता वाटतंय. माझ्या बऱ्याच investments
आहेत आणि होम लोन पण चालू आहे. आता
तुम्ही काही मदत कराल का?
तर मुळात दोन्ही करप्रणालीत थोडक्यात फरक सांगायचा तर नवीन
scheme ही व्यक्ति, हिंदू अविभक्त कुटुंब, AOP, BOI यांना घेता येऊ शकते.
जुन्या scheme खाली ज्याला कर भरायचा आहे. त्याला कायद्यात असलेल्या सर्व
सवलती किंवा' वजावटी मिळतील. नवीन regime निवडणाऱ्याना
मर्यादित सवलती मिळतील आणि टॅक्सचा दर मात्र थोडा कमी असेल, थोड्या कमी दराने कर भरता येईल.
नवीन करप्रणाली ही आर्थिक वर्ष 2023-24 पासून डिफॉल्ट करप्रणाली म्हणून लागू होत असली तरी ही Scheme Optional आहे, सक्तीची अजिबातच नाही. ज्या taxpayer ना व्यवसायाचे उत्पन्न नाही तो दरवर्षी टॅक्स नव्या regime खाली भरायचा का जुन्या ते ठरवू शकतो. कुठल्या scheme खाली आपल्या उत्पन्नावर कर भरावयाचा याचे संपूर्ण स्वातंत्र्य करदात्याला आहे. फक्त हे रिटर्न फाइल करण्याच्या due date च्या आधी ठरवावे लागते. तुम्ही तुमच्या employer कडे एक टॅक्स regime निवडली असेल पण आता मात्र दुसऱ्या टॅक्स regime खाली टॅक्स भरायचा असेल तर सहज तसं करणं शक्य आहे. त्यामुळे तुमचे व्यवसायाचे उत्पन्न नसेल तर कोणत्या regime खाली टॅक्स भरायचा हे तुमच्या CA कडून रिटर्न फाइल करायच्या आधी समजून घ्या आणि त्यानुसार योग्य करप्रणाली रिटर्न भरताना निवडा.
24 मे 2024
CA Kalyani Vaidya-Borkar
8087000955
#Happytaxseason
#growwithgrace

Comments
Post a Comment