Income tax return दाखल करताना

 रिटर्न file करायचा आहे तर कोणती माहिती द्यायला हवी ? कोणता ITR form लागू होईल ते कसे ठरते? मागच्या वर्षी itr 1 भरला होतात ह्या वर्षी itr 3 का लागेल? असे संवाद सहाजिक रिटर्न दाखल करत असताना अनेकदा client बरोबर होतात. त्याबद्दल आज थोडसं समजून घेऊ.साधारणपणे आपल्याला मिळणारे income हे आपण income टॅक्स रिटर्न दाखल करत असताना 5 भागात विभागलेले असते आणि ते तसे तसे त्या head खाली दाखवणे अपेक्षित आहे.

1.   Income from salary

2.   Income from House Property 

3.   Profit and gains from business/profession

4.   Income from capital gain

5.   Income from other source

 ह्या पैकी आपल्याला कोणकोणते उत्पन्न लागू होते, मिळते त्यानुसार कोणता रिटर्न form भरावा लागेल ते निश्चित होते. त्या फॉर्मनुसार काही माहिती संविस्तरपणे किंवा थोडक्यात द्यावी लागते.

ह्या पैकी आपल्याला ज्या ज्या head खाली उत्पन्न मिळत असेल त्या सर्वांचे तपशील आपण आठवणीने CA ला देणे आवश्यक आहे. ही माहिती आर्थिक वर्ष 1 एप्रिल 20..... ते 31 मार्च 20..... असे जे वर्ष लागू असेल त्या कालावधीची आहे ना हे नीट तपासणे आवश्यक आहे.

यंदाची माहिती आर्थिक वर्ष 2023 ते 2024 साठीची(FY 2023-24/AY 2024-25)) म्हणजे 1 एप्रिल 2023  ते 31 मार्च 2024 ह्या period ची असायला हवी.

1.   सॅलरी करीता form 16 part A आणि part B दोन्ही द्यायला हवे (itr 2 लागू होत असेल तर त्याबरोबर सॅलरी bifurcation म्हणजे salary ही Basic, DA, HRA अशा component मध्ये असते त्याचे heading नुसार पूर्ण तपशील देणे आवश्यक आहे)

2.   जर तुम्हाला काही कारणाने form 16 मिळाला नसेल तर बँक खात्यात जो पगार जमा होतो त्याचे तपशील

3.   तुम्ही old regime opt करणार असाल तर तुमच्या टॅक्स saving investments चे संपूर्ण तपशील जसे की PPF गुंतवणूक, मेडिकल insurance इत्यादि

4.   Home loan चालू असेल आणि त्याची वजावट घेणार असाल तर होम लोन interest certificate

5.   जर घर भाड्याने असेल तर भाडेकरुचे नाव, pan नंबर ,दरमहा किती भाडे मिळते त्याचा तपशील ,प्रॉपर्टी टॅक्स भरला असल्यास त्याची पावती ,rent agreement ची कॉपी

6.   जर नोकरीबरोबर व्यवसाय असेल तर त्यांच्या बँक खात्याचे  पूर्ण स्टेटमेंट, खरेदी व विक्रीची बिले इत्यादि

7.   जर भारतातील shares किंवा mutual फंड विकून नफा किवा तोटा झाला असेल तर त्याचे capital gain statement  किंवा profit and  loss statement.  इथे एक छोटासा पण अनेकजणाना प्रश्न असलेला मुद्दा बघू.  जेव्हा तुम्ही equity shares ,mutual fund यासोबत future and option मध्ये ट्रेड करता तेव्हा इन्कम टॅक्सच्या दृष्टीने त्याचा जो फायदा तोटा असेल तो कॅपिटल gain म्हणून consider न् होता income from business म्हणून धरला जातो आणि अशा वेळी तुमचा वेगळा व्यवसाय नसतानाही तुम्हाला itr 3 भरावा लागू शकतो.

8.   जर परदेशातील शेअर ESPP किंवा ESOP ह्या form मध्ये मिळत असतील तर त्याचे संपूर्ण डिटेल्स (perquisite statements, share sale transaction details, etc.) हे तपशील कंपनी नुसार थोडेफार बदलत असल्याने ते इथे सविस्तर मांडत नाहीये. 

9.   एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला परदेशी कंपन्यांचे मिळणारे shares आणि भारतातील shares यांचा कॅपिटल gain काढण्याची पद्धत, टॅक्स rate वेगळे आहे. पण परदेशतील shares ची विक्री केली असेल तर ते भारतातील टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमचे sale चे पैसे इथल्या अकाऊंटला येण्याची आवश्यकता नाही. 

10. तुमच्याकडे काही unlisted कंपन्यांचे shares असतील तर त्याचे तपशील द्यायला हवे.  तुमच्याकडे असलेले हे shares तुम्ही चालू आर्थिक वर्षात जरी विकले नसतील तरी त्याची नुसती माहिती देणेही आवश्यक आहे.  ती आपल्याला काही रिटर्न form  मध्ये compulsory द्यावी लागते.

11. तुम्ही आर्थिक वर्षात जर तुमची एखादी asset जसे की घर, प्लॉट इत्यादि विकले असेल तर त्याची माहिती 

12. ·Saving interest आणि fixed deposit interest ची interest certificate

13. वर्षभरात मिळालेल्या भारतातील आणि भारताबाहेरील dividend income चे तपशील

14. इतर काही income जसे की कमिशन, काही professional फी इत्यादि

15.·तुमचा पगार व इतर उत्पन्न मिळून टोटल income हे 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास asset liability schedule भरावे लागेल त्यासाठी चा format स्वतंत्र दिला जाईल

16. तुमचे भारताबाहेर बँक खाते किंवा depository account असेल तर त्याचे तपशील

17. तुमच्या भारताबाहेर काही asset असतील तर त्याचे तपशील जसे की घर, shares, car इत्यादि ह्या रिटर्न मध्ये दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या न दाखवल्यास Black money act अंतर्गत साधारण 10 लाखांपर्यंत penalty आहे. ज्याना फॉरेन asset मिळतात त्यांच्यासाठीच्या penalty आणि itr मधे काही गोष्टी disclose करण्याची आवश्यकता स्वतंत्र ब्लॉग मध्ये पाहूच.

टिप : वरील मुद्दयात साधारणपणे रिटर्न भरायला resident individual ला लागणारे कागदपत्र नमूद केले आहेत याशिवाय case to case बेसिस वर इतर काही कागदपत्र आवश्यक ठरू शकतात.

NRI लोकाना रिटर्न फाइल करायला लागणाऱ्या documents ची माहिती एका वेगळ्या ब्लॉग मध्ये पाहू. हा लेख म्हणजे कोणताही आर्थिक सल्ला नाही तर रिटर्न फाइल करताना लागणाऱ्या माहितीचा overview यावा यासाठी आहे.

CA Kalyani Vaidya-Borkar

8087000955

#happytaxseason

#growwithgrace

Comments

Popular posts from this blog